![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
||||
|
||||||||
|
राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम
सदर कार्यक्रमांतर्गत लातूर जिल्हयातील शेतक-यांच्या विविध कामासाठी आवश्यक 7/12 उपलब्ध होण्याची अडचण दुर करण्यात आलेली आहे. जिल्हयातील सर्व महा ई सेवा केंद्र, 11 सेतू सुविधा केंद्र या ठिकाणी 7/12 ची प्रमाणित प्रत उपलब्ध करण्यात आली असून अप्रमाणित प्रत शेतक-यांना http://latur.nic.in या जिल्हयाच्या वेबसाईटवरही विनामुलय उपलब्ध आहे.
लातूर जिल्हयाच्या वेबसाईटवर 7/12 उपलब्ध करून देणारा लातूर हा राज्यातील पहीला जिल्हा आहे. त्याचप्रमाणे या कार्यक्रमांतर्गत जिल्हयातील सर्व 7/12 नविन साफटवेअरमध्ये परिवर्तीत करण्यात आला असून त्याची बिनचुकता पडताळुन तो राज्यस्तरीय सर्व्हरवर ठेवण्यात आला आहे. दुय्यम निबंधक कार्यालय, तहसिल कार्यालय ऑनलाईन लिंकेज कार्यान्वित करून प्रथम औसा त्यानंतर लातूर, निलंगा, उदगीर व त्यानंतर सहा तालुक्यामध्ये ऑनलाईन वेबबेसड फेरफार नोंदी घेण्याबाबतचे काम कार्यान्वित करण्यात येणार आहे.
तालुक्याचे सर्व्हरवर असणारे 7/12 चे अभिलेख राज्य स्तरावरील सर्व्हरद्वारे ठेवणे, अद्यावत व फेरफार पध्दतीत सुलभता आणणे यामुळे शक्य झाले आहे. तसेच जिल्हयातील ज्या गावात बाजार भरतो तेथे बाजारचे दिवशी लोकांना 7/12 मिळावा यासाठी सेतू ऑपरटेरच्या माध्यमातून एक कॉम्प्युटर व प्रिंटर मोबाईल व्हॅनद्वारे लोकांना उपलब्ध करून देण्याचा, मोबाईल 7/12 वाटपाचा कार्यक्रम देखील राज्यात सर्वप्रथम लातूर जिल्हयात राबविण्यात आला आहे.
|
|
|
|||||||||||