Latur District Website Latur District Website Latur District Website Latur District Website Latur District Website
मराठी
Search in Site
महसूल प्रशासनात माहिती तंत्रज्ञानाचा वापर
लातूर जिल्‍हयात सर्व तहसिल कार्यालयात व जिल्‍हाधिकारी कार्यालयात व्हिडीओ कॉन्‍फरन्‍स हॉल स्‍थापित करण्‍यात आलेला असून शासन/ मा विभागीय आयुक्‍त यांच्‍यासमवेत होणा-या बैठका हया व्हिडीओ कॉन्‍फरन्‍सद्वारे घेतल्‍या जातात. तसेच सर्व महसूल अधिकारी यांच्‍यासमवेत होणा-या महावार बैठका हया व्हिडीओ कॉन्‍फरन्‍सद्वारे घेतल्‍या जातात. लातूर जिल्‍हयातील सर्व तहसिलदार /उपजिल्‍हाधिकारी/ उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयाचे ई-मेल आयडी तायार करून घेण्‍यात आले असून सर्व पत्रव्‍यवहार हा ई-मेलद्वारे केला जातो. तसेच तात्‍काळ कामासाठी एसएमएसचा वापर केला जातो.

लातूर जिल्‍हा वेबसाईटवर सर्व जनतेस पहाण्‍यासाठी अर्धन्‍यायीक कामकाजातील न्‍यायविवाडे - आरओआर/आरटीआय/ग्रामपंचायत निवडणुक इत्‍यादी उपलब्‍ध करून देण्‍यात आलेली आहेत. जिल्‍हा वेबसाईटवर मागील 54 वर्षांची दैनंदिन पर्जन्‍यमानाची माहिती ठेवण्‍यात आलेली आहे.

सेतू सुविधा केंद्रामार्फत देण्‍यात येणा-या सुविधेमध्‍ये वाढ करून विविध शासकीय कार्यालयाच्‍यां मिळून 215 सेवा सध्‍या नागरिकांना पुरविण्‍यात येत आहेत. सदरील 215 प्रकारच्‍या सेवांचे दाखले व अर्जाचे नमुने http://latursetuonline.com या वेबसाईटवर नागरिकांसाठी ठेवण्‍यात आलेली आहेत.

जिल्‍हाधिकारी कार्यालयात मध्‍यवर्ती आवक-जावक शाखेत टपाल नियंत्रण पध्‍दतीच्‍या प्रणालीचा अवलंब करण्‍यात येत आहे. तसेच जिल्‍हाधिकारी कार्यालयात येणा-या नागरिकांकरिता सहज माहिती उपलब्‍ध व्‍हावी म्‍हणुन सन 2008 पासून Touch Screen Kiosk सुरू करण्‍यात आलेला आहे.
शासन आदेशानुसार दर महिन्‍याच्‍या पहील्‍या शनिवारी टेंक सॅटरडे साजरा करण्‍यात येत असून त्‍यात सर्व अधिकारी / कर्मचारी यांना तंत्रज्ञान क्षेत्रातील तंज्ञाकडून प्रशिक्षण देण्‍‍यात येत आहे.

Contact Us Site Map
No. of Visitors since 13th June, 2011
Latur District Website
Site Designed and Developed by
National Informatics Centre, Department of Information Technology
Ministry of Communications and Information Technology
District Centre Latur
.
Site is best viewed in Internet Explorer 7 & above with resolution 1024x768.

Latur District Website
Disclaimer: All the Contents provided, maintained and updated by the District Administration LATUR. email ID- feedback.latur@gmail.com